#व्हेज_मेयो_सँडविच
• Simple Recipe
• मुलांना बनवता येईल असा पदार्थ..
©सौ. सुचिता वाडेकर...✍️
व्हेज मेयो सँडविच बनवायला एकदम सोपे आहे आणि मुलं आरामात बनवू शकतात. साहित्य देखील सहज उपलब्ध होणारे आहे. फक्त ब्रेड आणि मेयोनीझ आणावे लागते. ते बाजारात सहज मिळते. शक्यतो गव्हापासून बनवलेला ब्रेड वापरवा.
माझी अकरा वर्षीची मुलगी स्वतः बनवते हे सॅन्डविच. माझ्याकडे भाजी चिरण्याचे कटर आहे त्यात ती भाज्या चिरून घेते आणि स्वतः बनवते.
Summer Recipe : Watermelon Juice Simple Recipe
त्यामुळे मुलांना सहज बनवता येईल असा हा पदार्थ आहे. मेयो मुळे चव छान येते.. कच्च्या भाज्याही(सॅलड) पोटात जातात, मुलेही एकदम खुश होतात.. त्यांनाही काहीतरी बनवल्याचा आनंद मिळतो आणि आईलाही एकदिवस सुट्टी मिळते.
तुम्हीही असा प्रयत्न करून बघा आणि मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पहा. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण पाहुयात...🔽
#व्हेज_मेयो_सँडविच
• साहित्य :
• ब्रेड स्लाईस
• अमूल बटर
• बारीक चिरलेली सिमला मिरची - 1/4 कप
• किसलेले गाजर - 1/2 कप
• बारीक चिरलेला कांदा - 1/2 कप
• बारीक चिरलेला टोमॅटो - 1/2 कप
• बारीक चिरलेली काकडी - 1/4 कप
• मीठ - 1/2 चमचा
• काळी मिरी पावडर - 3/4 चमचा
• मेयोनीझ - 4 मोठे चमचे
• कृती :
1. प्रथम एका मोठ्या बाउल मध्ये बारीक चिरलेली सिमला मिरची, किसलेले गाजर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली काकडी एकत्र करावे.
2. यानंतर यात काळी मिरी पावडर, मीठ आणि मेयोनीझ घालून चांगले मिक्स करावे.
3. यानंतर दोन ब्रेड स्लाईसला बटर लावून घ्यावे.
4. एका स्लाईसवर तयार केलेले भाज्यांचे बॅटर पसरवावे आणि वरून दुसरी बटर लावलेली स्लाईस ठेवावी.
5. याला तिरका काप द्यावा आणि तयार झालेले सॅन्डविच तव्यावर थाडे बटर टाकून दोन्ही बाजूनी भाजून घ्यावे अथवा सॅन्डविच टोस्टर असेल तर त्यामध्ये ग्रील करावे.
6. आपले 'व्हेज मेयो सँडविच' तैयार!
मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत.. मुले बोर झाली असतील तर स्वयंपाकात त्यांची मदत घ्या कारण या वयोगटातील मुलांना पालकांना मदत करायला खुप आवडते.
Mother's Day : "आगळावेगळा मातृदिन" लेकीने दिले मला एक दिवसाचे माहेर.
• मग नक्की बनवणार ना छोट्या मित्रांनो 'व्हेज मेयो सँडविच..!'
• बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका..
• रेसिपी आवडल्यास जरूर शेअर करा..
• पण माझ्या नावासहित..
• कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
धन्यवाद! 🙏🏻
©सौ. सुचिता वाडेकर...✍️
0 टिप्पण्या