'गव्हाचा_चीक'
©सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️पौष्टिक रेसिपी : "आरोग्यदायी गव्हाचा चीक" घरी पिढ्यानंपिढ्या बनवली जाणारी परंतु आता दुर्मिळ होत चाललेली पाककृती |
घरी पिढ्यानंपिढ्या बनवली जाणारी पण आता दुर्मिळ झालेली पाककृती म्हणजे 'गव्हाचा_चीक'. तुम्ही करून बघितलाय का कधी..? तुमच्या आजीने केलेला तुम्हाला आठवत असेल बहुदा. अतिशय चवदार लागतो शिवाय अत्यंत पौष्टीकही आहे.
बनवायला थोडा किचकट वाटतो पण आरोग्यदायी असल्यामुळे पूर्वी थंडीमध्ये रोज सकाळी सकाळी गरमागरम गव्हाचा चीक केला जायचा. आता ही पाककृती दुर्मिळ होत चालली आहे.. सर्वांनाच सर्व इन्स्टंन्ट हवं असतं.. पण काही गोष्टीसाठी थोडे कष्टही घ्यावे लागतात हेही तितकंच खरं.
उन्हाळ्याच्या दिवसात याच चिकापासून गव्हाच्या कुरडया केल्या जातात. मात्र कुरडई बनवताना त्यात साखरेचा वापर करत नाहीत.
यासाठी खपली गहू मिळाला तर उत्तम. नाहीतर साधा तुमच्याकडे जो असेल तो वापरला तरी चालेल.
पाहुयात याची साहित्य आणि कृती.
तुम्हीही जरूर करून बघा. 👍
'गव्हाचा_चीक'
गव्हाचा चीक बनवण्यासाठी साहित्य.. ⤵️• साहित्य :
• गहू - 2 वाटी
• साखर - 1 वाटी
• तूप - 2-3 चमचे
• वेलची पावडर - अर्धा चमचा
• दूध - अर्धा लिटर
• पाणी - आवश्यकतेनुसार
Marathi Recipe : How to make - हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची भाजी
गव्हाचा चीक बनवण्याची कृती.. ⤵️
कृती :
1. गहू स्वछ धुवून मोठ्या पातेल्यात पाण्यात भिजत घालावेत.. आणि 3 दिवस भिजत ठेवावेत.
2. रोज रात्री यातील पाणी बदलावे.. अन्यथा वास येईल.
3. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी यातील पाणी काढून भिजलेले गहू मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यावेत.
4. गहू वाटताना आवश्यकतेनुसार पाणी घालावे.
5. तयार झालेले बॅटर चाळणीतून गाळून घ्यावे.
6. गाळलेले मिश्रण तसेच झाकून ठेवून द्यावे.
7. दुसऱ्या दिवशी सकाळी मिश्रण न हालवता त्यावरील पाणी काढून टाकावे.
8. नंतर मिश्रण चमच्याने हलवून जाड बुडाच्या पातेल्यात काढून घ्यावे.
9. या मिश्रणात दूध आणि साखर घालून ते पुन्हा हलवून घ्यावे.
10. नंतर हे पातेले गॅसवर ठेवून चीक घट्ट होईपर्यंत हालवत रहावे.
11. त्यामध्ये तूप, वेलची पावडर घालावी आणि गॅसची आच मंद ठेवावी.
12. थोड्या वेळात चीक घट्ट होऊ लागेल आणि त्याचा कलरही थोडा बदलेल. याचा अर्थ चीक तयार होऊ लागला आहे.
13. दोन तीन मिनिटांनी गॅस बंद करावा.
14. तूप घालून गरमागरम सर्व्ह करावा.. 'गव्हाचा चीक'
• दुर्मिळ परंतु अत्यंत पौष्टीक अशी पारंपारीक डिश आहे.
• कशी वाटली रेसिपी..
• आवडली का..
• मग तुम्ही बनवा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
• रेसिपी आवडल्यास जरूर शेअर करा.. पण माझ्या नावासहित.
• कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
धन्यवाद! 🙏🏻
©सौ. सुचिता वाडेकर..✍🏻️
0 टिप्पण्या