Marathi Kavita : आजही आठवतो तो

 








"आजही आठवतो तो..."

©सौ. सुचिता वाडेकर... ✍️

कविता : "दोन शब्द प्रेमाचे.."

आजही आठवतो तो..

तो नेहमी शाळा सुटताना यायचा..

तो आला की सर्वांची एकच गडबड उडे..

शाळा सुटताच बारदानाच्या खोळीत..

देह लपवन्यासाठी चाललेली धडपड..

रस्त्यावर साचलेल्या डबक्यात..

मारलेल्या मनसोक्त उड्या..

सभोवार उडालेले पाणी..

अन पसरलेले तरंग..

त्यावर आलेले बुडबुडे..

त्यात सोडलेल्या कागदाच्या नावा..

त्या तरंगताना झालेला हर्ष..

दगडाच्या कपारीतून डराव-डराव..

बेडकाचे एकसारखे ओरडणे..

चाहूल लागताच त्याने मारलेली..

टुणकण उडी..





Marathi Kavita : Mother-in-law सासू म्हणजे सासू असते, तुमची आमची सेम असते.. तिच्या जागी स्वतःला ठेवले, तर आपल्यालाही ती कळून चुकते..!


भिजलेले अर्धे अंग पाहून..

आजीने केलेली शेकोटी..

आणि त्यावर भाजलेले..

गरमागरम मक्याचे कणीस..

आजही आठवतो तो..

सोबत घेऊन येणारा..

ढगांचा गडगडाट..

वीजांचा लखलखाट..

घाबरून आजीने उंबऱ्याजवळ..

ठेवलेली लोखंडी पहार..

वळचनीचे पडणारे धोधो पाणी..

गळणाऱ्या पत्र्याखाली..

ठेवलेल्या भांड्यात..

पडणाऱ्या पाण्याचा..

टपटप आवाज..

आजही आठवतो तो..

तो म्हणजे आठवणीतला पाऊस..!

सोबत आठवतात मित्र मैत्रिणी.. 

अन आपली जिवाभावाची माणसं...!!


Marathi Kavita : 'चहा गार होत आहे' प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीच्या भावनांची खिल्ली न उडवता तिची तळमळ, प्रेम समजून ते जपले तर किती छान होईल नाही.

• तुम्हाला देखील आठवला का तो..


• आठवला असेल तर जरूर कमेंट करा..


• आणि आवडल्यास शेअर देखील करा.. पण माझ्या नावासहित..


• कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.


धन्यवाद! 🙏🏻

©सौ. सुचिता वाडेकर... ✍️


कविता : "चार भिंतीची कैद" विश्व मराठी परिषदेने लॉकडाउन मध्ये घेतलेल्या 'कविता लेखन' स्पर्धेत माझ्या या कवितेला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या