"Sprout Cutlet Recipe in Marathi" मोड आलेल्या कडधान्यापासून बनवलेले पौष्टीक कटलेट प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. तुम्हाला ठाऊक आहे का रोजच्या आहारातील प्रोटीनचं महत्व?

"Sprout Cutlet Recipe in Marathi" मोड आलेल्या कडधान्यापासून बनवलेले पौष्टीक कटलेट


"Sprout Cutlet Recipe in Marathi"
मोड आलेल्या कडधान्यापासून बनवलेले पौष्टीक कटलेट
प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे.
तुम्हाला ठाऊक आहे का
रोजच्या आहारातील प्रोटीनचं महत्व? 

"Sprout Cutlet Recipe in Marathi" तुम्हाला माहिती असेल की रोजच्या आहारात प्रोटीनचे किती महत्व असते आणि हे प्रोटीन आपल्याला मिळतं वेगवेगळ्या कडधान्यापासून. मोड आणलेली कडधान्य हे प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. मोड आलेली कडधान्ये आरोग्यच्या दृष्टीने फायदेशीर असली तरी अनेकांना ती आवडत नाहीत.


रोज चावीष्ट नाष्टा करणाऱ्यांना कडधान्ये आवडत नाहीत तरीही मोड आलेल्या कडधान्याचा रोजच्या आहारात वापर जरूर करावा.. कारण मोड आलेली कडधान्ये अतिशय पौष्टिक असून त्याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात.





• मोड आलेल्या कडधान्याचे फायदे


मोड आलेल्या कडधान्याचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी याचा उपयोग होतो. मोड आलेली कडधान्ये रोजच्या आहारात असतील तर तुमच्या स्किनचा पोत (टोन) सुधारतो. यात असलेल्या फायबर मुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते.


Marathi Recipe : मिक्स_व्हेजी_सूप मुलांनी सगळ्या भाज्या खाव्यात असं वाटतं ना..! मग नोट करा ही रेसिपी मुले ही पितील अगदी आवडीने.


एका ठराविक वयानंतर वजन वाढण्याची समस्या निर्माण होऊ लागते त्यावेळी वजन कमी करण्यासाठी ही मोड आलेली कडधान्ये आहारात असणं विशेष फायदेशीर ठरते. गर्भवती स्त्रियांनी मोड आलेल्या कडधान्याचा वापर रोजच्या आहारात जरूर करावा.


लहान मुलांचे वाढीचे वय असते त्यामुळे त्यांना पौष्टिक आहार देण्यासाठी मोड आलेल्या कडधान्याचा वापर फायदेशीर ठरतो. आजारपणात कमी झालेली शक्ती भरून काढण्यासाठी डॉक्टर देखील रोज मोड आलेली कडधान्ये खाण्याचा सल्ला देतात. 


नाष्ट्यामध्ये मोड आलेली कडधान्ये खाणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असते, यामुळे शरीर तंदुरुस्त तर राहतेच पण शरीरातील चरबी ही कमी होण्यास मदत होते त्यामुळे साहजिकच वजन कमी होते. 


"Sprout Cutlet Recipe in Marathi" रोज मोड आलेल्या कडधान्याचा वापर नाष्ट्यामध्ये केल्यास दिवसभर एनर्जेटीक वाटते. असं म्हणतात की सकाळचा नाष्टा राजसारखा करावा अगदी भरपेट, दुपारचे जेवणही पोटभर करावे मात्र रात्री हलका आहार घ्यावा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रोटीनची आवश्यकता असते आणि ती भरून काढण्यासाठी आहारात वेगवेगळ्या कडधान्यांचा वापर करावा. यासाठी कडधान्याला मोड आणावेत.


Marathi Recipe : "गुळ, शेंगदाणा, खजुराचे पौष्टीक लाडू" मुलांनी खायलाच हवा असा पदार्थ. नोट करा याच्या सेवनाचे फायदे.


• Preparation तयारी :


कडधान्याला मोड आणण्यासाठी कडधान्य दोन तीन वेळा स्वछ पाण्याने धुहून घ्यावीत व आठ तासांसाठी पाण्यात भिजत घालावीत. शक्यतो रात्री भिजत घालावीत म्हणजे सकालपर्यंत चांगली भिजतात. आठ तासानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातील पाणी काढून कडधान्य चाळणीवर निथळून चाळणीतच ठेवावीत. वरून झाकण ठेवावे.


दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तासानंतर त्याला चांगले मोड आलेले तुम्हाला दिसतील. कडधान्याला मोड आणण्याची ही सोपी पद्धत आहे. एखाद्या कपडामध्ये बांधूनही कडधान्याला मोड आणता येतात पण कपड्यामध्ये न बांधता चाळणीवर ठेवले तरी चांगले मोड येतात.


"Sprout Cutlet Recipe in Marathi" या मोड आलेल्या कडधान्यापासून वेगवेगळ्या डिशेस बनवता येतील जेणेकरून जास्तीत जास्त प्रोटीन अन्नातून आपल्या शरीरात पोहोचू शकेल. त्यापैकीच ही डिश म्हणजे मिश्र कडधान्यापासून बनवलेले पौष्टिक कटलेट. मुलेही अगदी आवडीने खातात. तुम्हीही करून बघा.


चला तर मग पाहुयात याची साहित्य आणि कृती.. ⤵️










Marathi Recipe : करा मिश्र भाज्यांचे पोष्टिक आप्पे. झटपट होणारे हे आप्पे मुलेही खातील अगदी आवडीने 

"Sprout Cutlet Recipe in Marathi" : मोड आलेल्या कडधान्यापासून बनवलेले पौष्टीक कटलेट


• कुरकुरीत आणि स्वादिष्ट स्प्राउट कटलेट रेसिपी बनवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक ⤵️


साहित्य :


● मोड आलेली मिश्र कडधान्ये 1 वाटी

● दही 2 चमचे

● आले 1 चमचा

● लसूण 4 पाकळ्या

● मिरची 3

● मीठ आवश्यकतेनुसार

● सिमला मिरची 1

● कोबी  1 वाटी 

● कांदा 1

● पोहे 1 वाटी 

● कॉनफ्लॉवर 4 चमचे

● शेवई 1 वाटी

● तळण्यासाठी तेल 


• कुरकुरीत आणि स्वादिष्ट स्प्राउट कटलेट रेसिपी बनवण्यासाठी आवश्यक कृती.. ⤵️


कृती : 


1. प्रथम मोड आलेल्या कडधान्यची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यावी.






2. या पेस्टमध्ये 2 चमचे दही घालून 4 तास झाकून ठेवावे. 


3. चार तासानंतर त्यात आले, मिरची, लसूण, मीठ घालून मिक्सरला पेस्ट करून घ्यावी.  


4. नंतर हे बॅटर ढोकळ्याप्रमाणे 20 मिनिटे वाफवून घ्यावे.






5. तोपर्यंत कांदा, सिमला मिरची बारीक चिरावी, कोबी उभा चिरावा आणि पोहे भिजवावेत. 


6. 20 मिनिटानंतर तयार झालेली ही उकड हाताने मोकळी करावी आणि त्यात भिजवलेले पोहे, चिरलेला कांदा, सिमला मिरची,कोबी घालावा व आवश्यक(उकड मध्ये घातलेले आहे) मीठ घालून एकत्र करून गोळा बनवावा.





7. तयार झालेल्या गोळ्याचे छोटे-छोटे गोळे करून त्याला कटलेटचा आकार द्यावा. 


8. एकीकडे तेल तापत ठेवावे आणि कॉनफ्लॉवरची पेस्ट तयार करावी व शेवई डिश मध्ये काढून घ्यावी. 


9. तेल तापल्यावर गॅस बारीक करावा आणि तयार केलेले कटलेट कॉनफ्लॉवरच्या पेस्ट मध्ये बुडवून शेवई मध्ये घोळवून खरपूस तळून घ्यावेत.


Mother's Day : "आगळावेगळा मातृदिन" लेकीने दिले मला एक दिवसाचे माहेर.


10. आपले गरमागरम, मोड आलेल्या कडधान्या पासून बनवलेले पौष्टीक स्प्राऊट कटलेट्स तैयार!


● सॉस, कोबी आणि सिमलामिरचीचे सॅलेड सोबत सर्व्ह करावे "Sprout Cutlet"



"Sprout Cutlet Recipe in Marathi"
मोड आलेल्या कडधान्यापासून बनवलेले
पौष्टीक कटलेट प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे.
तुम्हाला ठाऊक आहे का
रोजच्या आहारातील प्रोटीनचं महत्व? 



• कशी वाटली रेसिपी 

• आवडली का.. तुम्हीही करून बघा.


• आवडली असेल तर जरूर कमेंट करा आणि तुमचे अनुभव ही जरूर शेअर करा.


• रेसिपी आवडल्यास शेअर देखील करा.. पण माझ्या नावासहित..


• कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.


धन्यवाद..! 🙏🏻

© सौ. सुचिता वाडेकर…✍🏻️


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या