Marathi Recipe : Solkadhi सोलकढी ही पित्तशामक असून एक उत्तम पाचक पेय आहे


Marathi Recipe : Solkadhi
सोलकढी ही पित्तशामक असून
एक उत्तम पाचक पेय आहे  


सोलकढी 


उन्हाळ्याच्या दिवसात पिण्यासाठी 'सोलकढी' हे एक उत्तम पाचक पेय आहे. शरीराला थंडावा मिळावा आणि उष्णतेचा त्रास कमी व्हावा म्हणून सोलकढी पिली जाते. तसेच सोलकढी ही पित्त शामक असल्यामुळे ती पिल्याने अन्न पचन देखील होण्यास मदत होते. म्हणूनच विशेषतः मासे खाताना सोलकढी पिली जाते. कित्येक घरी मच्छीचे जेवण असेल त्यादिवशी आवर्जून सोलकढी बनवली जाते.



सोलकढी बनवायला अगदी सोपी आहे. यासाठी साहित्यदेखील कमी लागते, मात्र यासाठी ओला नारळ आणि आमसूले आवश्यक आहेत. चार पाच आमसूले वाटीभर पाण्यात थोडावेळ भिजत घातली की काम झाले. आमसूले नसतील तर कोकमाचं आगळ मिळते बाजारात ते वापरले तरी चालते. आगळ म्हणजे कोकमचा रस असतो, हल्ली किराणा दुकानात तो अगदी सहज उपलब्ध असतो.


काही ठिकाणी ताकाची देखील सोलकढी बनवतात पण नारळाच्या दुधापासून बनवलेली सोलकढी एकदम चावीष्ट लागते. मुले देखील ही सोलकढी अगदी आवडीने पितात. फक्त उन्हाळ्यातच नाही तर एरवी देखील सोलकढी पिणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. मग वाट कसली बघताव.. लिहून घ्या याची सहित्य आणि कृती.


Summer Recipe : Virgin_Mojito Simple Recipe मुलांनाही सहज बनवता येईल असे पेय..

• सोलकढी बनवण्यासाठी लागणारे साहित्य.. ⤵️


एक नारळ

सहा ते सात आमसूले

किंवा अर्धी वाटी आगळ

लसूण 3-4 पाकळ्या

हिरवी मिरची 2

मीठ आवश्यकतेनुसार



सोलकढी बनवण्याची कृती.. ⤵️


प्रथम नारळ फोडून खोवणीवर किंवा विळीवर त्याचा चव काढून घ्यावा. नंतर एका मिक्सरच्या भांड्यात हा चव घेऊन त्यात लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, आमसूले घालावीत. यात पाणी घालून मिक्सरला चांगले फिरवून घ्यावे. यानंतर मिक्सरला फिरवलेले हे बॅटर गाळणीतून गाळून घ्यावे. उरलेल्या चोथ्यामध्ये आणखी थोडे पाणी घालून मिक्सरला फिरवावे आणि पुन्हा गाळून घ्यावे. तयार झालेल्या दुधात आवश्यकतेनुसार मीठ घालवे. आपली सोलकढी तैयार!



Marathi Recipe : Solkadhi
सोलकढी ही पित्तशामक असून
एक उत्तम पाचक पेय आहे  

Marathi Recipe : "गुळ, शेंगदाणा, खजुराचे पौष्टीक लाडू" मुलांनी खायलाच हवा असा पदार्थ. नोट करा याच्या सेवनाचे फायदे.

काचेच्या ग्लास मध्ये सर्व्ह करावी 'सोलकढी'.


टीप : आमसूलां ऐवजी आगळ वापरणार असाल तर आधी नारळाचे दूध काढून घ्यावे आणि मग आगळ मिक्स करावे. तुम्हाला किती आंबट आवडते त्यानुसार त्याचे प्रमाण ठरवावे. 


• कशी वाटली रेसिपी..

• आवडली का..


• मग तुम्ही बनवा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.


• रेसिपी आवडल्यास जरूर शेअर करा.. पण माझ्या नावासहित.


• कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.


धन्यवाद! 🙏🏻

©सौ. सुचिता वाडेकर..✍🏻️


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या