"Authentic Bhel Recipe in Marathi: A Delicious Snack for Every Occasion." "मराठीतील अस्सल भेळ रेसिपी: प्रत्येक प्रसंगासाठी एक स्वादिष्ट स्नॅक"


Authentic Bhel Recipe in Marathi


चटपटीत ओली "भेळ"

Authentic Bhel Recipe in Marathi

"मराठीतील अस्सल भेळ रेसिपी : प्रत्येक प्रसंगासाठी एक स्वादिष्ट स्नॅक"

Introduction


Authentic Bhel Recipe in Marathi "भेळ," नावाप्रमाणेच, एक चवदार स्ट्रीट फूड आहे. भारतीय स्ट्रीट फूड संस्कृतीत भेळचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईत चौपाटी भेळ अत्यंत प्रसिद्ध आहे. मुंबईतील प्रत्येक चौपाटीवर भेळी ची गाडी असते. महाराष्ट्राबरोबर भारतात अनेक ठिकाणी भेळ आवडीने खाल्ली जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच "भेळ" खुप आवडते. वळजवळ प्रत्येक गार्डनच्या बाहेर भेळ ची गाडी असतेच.


Authentic Bhel Recipe in Marathi "भेळ" चे विविध प्रकार आढळतात. ओली भेळ, सुकी भेळ, मटकी भेळ, तिखट भेळ, गोड भेळ, भाडंग भेळ इत्यादी. भेळ रेसिपी बनवण्यास अंत्यत सोपी आहे. यासाठी 15 ते 20 मिनिटे लागतात. सगळे साहित्य तयार असेल तर अगदी पाच मिनिटात भेळ तयार होते. भेळ हे एक उत्तम स्नॅक्स आहे. भेळ ही घरी बनवली तर कमी खर्चात घरातील सर्वांचे पोट भरते. ही बनवण्यास सोपी असून मोजक्या साहित्यात अगदी उत्तम बनते. उत्तम भेळ बनवण्यासाठी चिंचेची चटणी मात्र उत्तम असावी लागते.


Authentic Bhel Recipe in Marathi "भेळ" बनवण्यासाठी, मुरमुरे, फरसाण, कांदा, टोमॅटो आणि चंचेची चटणी हे प्रमुख आवश्यक घटक आहेत. गार्डनच्या बाहेर गाडीवर बनवली जाणारी "भेळ" घरच्याघरी कशी बनवायची ते आपण पाहुयात.


Evening Snacks : गरमा गरम 'बटाटे वडा' आणि गरमागरम 'वडापाव' 

मध्यन्तरी बाहेर खाण्यामुळे त्रास झाला होता 🤒 तेव्हा पासून कानाला खडा लावला.😔लेकीला सांगितले, "तुला हवे ते घरी बनवून देते पण बाहेर खाण्याचे नांव काढू नकोस.."


ती ही खुश…! 😍 यादीच करून दिली तिने. त्यातीलच एक मेनू म्हणजे,  “ओली चटपटित भेळ”. भेळीचे साहित्य घरी होतेच फक्त कांदा-टोमॅटो चिरले आणि चिंचेची चटणी बनवली. दोन मिनिटात "भेळ" तैयार! 😍


पुदिना गड्डी आणली की एवढ्या गड्डीचे करायचे काय असा प्रश्न नेहमी पडतो; त्यामुळे गड्डी आणली की लगेचच निवडून त्याची चटणी करून ठेवत असते मी फ्रिजमध्ये. त्यामुळे तीही होती.


Authentic Bhel Recipe in Marathi 'भेळ" संध्याकाळच्या नाष्ट्या साठी भेळ उत्तम पर्याय आहे. तुम्हीही करून बघा.. मात्र ही भेळ बनवण्यासाठी दोन चटण्या आवश्यक असतात त्या म्हणजे..

1. पुदिना चटणी

2. चिंचेची चटणी


पूर्व तयारी



• आधी या चटण्या कशा बनवायच्या ते पाहूयात आणि मग भेळ बनवूयात.



पुदिना चटणी


• पुदिना चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य.. ⤵️


• पुदिना गड्डी 1

• कोथिंबीर अर्धी गड्डी 

• पंढरपुरी डाळे 

• हिरवी मिरची 7-8

• लिंबू अर्धे 

• मीठ 1 चमचा 

• साखर 1 चमचा



Authentic Bhel Recipe in Marathi : Pudina Chatni
Marathi Recipe : Poha Chivda 'पातळ पोह्यांचा चिवडा' बनवा घरच्या घरी, उन्हाळ्यामध्ये बनवता येणारी अगदी सोपी रेसिपी.


• पुदिना चटणी बनवण्यासाठी आवश्यक कृती.. ⤵️


प्रथम पुदिना आणि कोथिंबीर निवडून, स्वछ धुवून घ्या. यानंतर मिक्सरच्या मोठ्या भांड्यात हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, डाळे, मीठ, साखर, लिंबू आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरला बारीक चटणी करून घ्यावी. आपली पुदिना चटणी तैयार झाली.


ही चटणी एका डब्यात घालून फ्रिजरला ठेवून द्यावी आणि लागेल तेव्हा तिचा वापर करावा. भेळ, पाणीपुरी, कटलेट, बटाटे वडे, बर्गर, दाबेली इत्यादी साठी तुम्ही या चटणीचा वापर करू शकता.



Authentic Bhel Recipe in Marathi : Pudina Chatni


आता पाहुयात चिंचेची चटणी कशी बनवायची.



चिंचेची चटणी


• चिंचेची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य.. ⤵️


• चिंच पाव किलो

• खजूर पाव किलो 

• गूळ पाव किलो

• लालतिखट 1 चमचा

• मीठ 1 चमचा



Authentic Bhel Recipe in Marathi : Chinchechi Chatni
Marathi Recipe : Chicken Paneer Roll "चिकन पनीर रोल" आहे हटके रेसिपी झटपट करा नोट


• चिंचेची चटणी बनवण्यासाठी आवश्यक कृती.. ⤵️


प्रथम चिंच स्वछ धुवून कोमट पाण्यात भिजत घालावी  आणि खजूरातील बिया काढून खजूरही पाण्यात भिजत घालावेत. यानंतर भजवलेली चिंच आणि खजूर मिक्सरला बारीक करून घ्यावी. मिक्सरला फिरवताना त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे आणि हे सर्व मिश्रण एका मोठ्या भांड्यात गाळणीने गाळून घ्यावे. यासाठी तारेची मोठी, गोल, पसरट चाळणी वापरावी म्हणजे गाळण्याची प्रक्रिया लवकर होते.


यानंतर हे भांडे गॅसवर ठेवावे. यात गुळ, लालतिखट आणि मीठ घालावे. गॅस मोठा ठेवावा. या मिश्रणाला उकळी आल्यावर गॅस बारीक करून हे मिश्रण चांगले दहा पंधरा मिनिटे उकळू द्यावे. याचा कलर चेंज झाल्याचे तुमच्या लक्षात येईल आणि चटणीही थोडी घट्ट होईल. आपली चंचेची चटणी तयार झाली.


ही चटणी गार झाल्यावर एका डब्यात किंवा बॉटल मध्ये भरून फ्रिजर ला ठेवून द्यावी व हवी तेव्हा तिचा वापर करावा. भेळ, पाणीपुरी, कटलेट, बटाटे वडे, बर्गर, दाबेली इत्यादी साठी तुम्ही या चटणीचा वापर करू शकता.



Authentic Bhel Recipe in Marathi : Chinchechi Chatni



Authentic Bhel Recipe in Marathi : Chinchechi Chatni


आपल्या दोन्ही चटणी तयार झाल्या आता आपण या चटण्यांचा वापर करून भेळ कशी बनवायची ते पाहुयात. 


चला तर मग पाहुयात..


चटपतीत ओली "भेळ"


Authentic Bhel Recipe in Marathi


•चटपटीत ओली "भेळ" बनवण्यासाठी लागणारं साहित्य.. ⤵️



• फरसाण 1 वाटी

• मुरमुरे 2 वाटी 

• कांदा 1

• टोमॅटो 1

• कोथिंबीर

• खारे शेंगदाणे 2 चमचे 

• पुदिना चटणी 1 चमचा 

• चिंचेची चटणी 4 चमचे

• चाट मसाला 1 चमचा

• कैरीचे छोटे तुकडे 2 चमचे

• बारीक शेव  4 चमचे



Authentic Bhel Recipe in Marathi

Marathi Recipe - Pav bhaji "पावभाजी" बिनाकांद्याची तुम्ही केलीत का कधी..?

• चटपटीत ओली "भेळ" बनवण्यासाठी आवश्यक कृती.. ⤵️


Authentic Bhel Recipe in Marathi प्रथम कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. यानंतर एका मोठया घमेल्यात किंवा मोठ्या पातेल्यात मुरमुरे, फरसाण  कांदा, टोमॅटो, कैरीचे तुकडे, पुदिना चटणी आणि चिंचेची चटणी घालावी. कोथिंबीर आणि चाट मसाला घालावा.


एका मोठया चमच्याच्या साहाय्याने हे सर्व साहित्य भराभर मिक्स करावं. तयार भेळ सर्व्हिग प्लेट मध्ये काढून घ्यावं. वरून पुन्हा थोडी कोथिंबीर आणि एक चमचाभर चिंचेची चटणी सोडावी. यावर बारीक शेव घालून डिश सर्व्ह करावी. आपली ओली चटपतीत "भेळ" तैयार!



Authentic Bhel Recipe in Marathi


खुप सुंदर होते ही भेळ, तुम्हीही नक्की करून बघा आणि मला जरूर कळवा. 


• टीप : खारे शेंगदाणे, कैरी, बारीक शेव आणि चॅट मसाला आठवणीने वापरावा. यामुळे "भेळ" चावीष्ट बनते.


• कशा वाटल्या तिनही रेसिपी..


• आवडल्या का..


• मग तुम्हीही बनवून बघणार ना पुदीना, चिंचेची चटणी आणि "भेळ"


• तुमचा फीडबॅक द्यायला विसरू नका..


• आणि हो रेसिपी fw करताना माझ्या नावासहित करा.


• अन्यथा कॉपी राईट कायद्याचा भंग होईल.


धन्यवाद..! 🙏🏻

©सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या