Breakfast Recipe in Marathi : Upma "पारंपारिक मराठी उपमा रेसिपी : चव आणि पोषण यांचे परिपूर्ण मिश्रण" |
"पारंपारिक मराठी उपमा रेसिपी : चव आणि पोषण यांचे परिपूर्ण मिश्रण"
"हेल्दी ब्रेकफास्टसाठी झटपट आणि सोपी मराठी उपमा रेसिपी"
#ब्रेकफास्ट
#उपमा हा एक स्वादिष्ट आणि पौष्टिक नाष्ट्यासाठी उत्तम पर्याय
Breakfast Recipe in Marathi आज काय स्पेशल तर 'उपमा'.. तुम्ही म्हणाल... त्यात स्पेशल ते काय? पण खरंच स्पेशलच झालाय. त्याचं असं झालं... सकाळी सकाळी नऊ वाजता 🕘उपमा करायला गेले तर लक्षात आले की मिरची 🌶 कालच संपली होती आणि आपण ती आणलेली नाहीये. आता काय करायचे..? 🤔
🌶 मिरची शिवाय उपमा म्हणजे कल्पनाच 🙄 करवत नव्हती.. अगदी नुसत्या कल्पनेनेच तोंड आळणी 😞 आळचाट झालं. रवा भाजून झाला होता.. एका गॅसवर पाणीही उकळले होते.. कांदा चिरून झाला होता.. शेंगदाणे साले काढून झाले होते. आता बेत रद्द करणं म्हणजे... थोडं अवघड वाटत होतं. त्यात 🌶 लाल मिरचीही घरात नव्हती.
मनात विचार आला, " लाल तिखट घालूयात का..?" कसं लागेल ते… तोंड अगदी कडू 😖 काहीतरी खाल्यासारखं झालं.. पण पर्यायच नव्हता काही. एक तर उपमा बेत रद्द करायचा.. नाहीतर लाल तिखट घालून नवीन प्रयत्न करून पहायचा. दुसऱ्या विचाराने बाजी जिंकली.. तशी आम्हा बायकांना प्रयोग या नावाखाली चालता-चालव करून वेळ मारून नेण्याची सवय उपजतच असते मुळी. या बाबतीत आम्ही मोठ्या वाकबदर.. 🤓 आमचा हात कोणी धरणार नाही.
Breakfast Recipe in Marathi पण खरं सांगू, हि सवय मला माझ्या सासऱ्यांमुळे लागली. माझ्या माहेरी भाजी आणून देण्याचे काम माझी आजी करायची अन सासरी माझे सासरे भाजी आणून देत असत. फक्त त्यांना भाजी संपण्यापूर्वी सांगावे लागत असे. माझ्या लग्नानंतर हि गोष्ट माझ्या काही लक्षात यायची नाही; त्यामुळे घरातील 🏨 सर्व भाजी संपलीय अन भाजी करायला भाजीच नाही अशी वेळ कधी कधी यायची.
त्यावेळी माझे सासरे मला सल्ला द्यायचे.. "काकडी आहे ना फ्रीज मध्ये.. मग कर त्याची भाजी". मी हि पडत्या फळाची आज्ञा मानून त्याप्रमाणे करत असे.. वेळ निभावून जाई. मग कधी थोडा फ्लॉवर.. एखादी सिमला मिरची असायची.. त्यात एखादा बटाटा आणि थोडेसे मटार घातले कि मिक्स व्हेज तयार व्हायची. हळू हळू मलाही हे सर्व जमायला लागले.. 😉😉
आणि खरं सांगू एखादा पदार्थ आवडला नाही तरी तो छान 👌 झालाय असं म्हणून खाणं हि गोष्टच काही और असते... बघा कधी प्रयत्न करून. आमच्या वाडेकरांची हि खासियत आहे. त्यामागे दोन हेतू असत.. एक म्हणजे अन्न हे पूर्णब्रम्ह आहे.. अन्नाला (आण्णाला असं ते स्वतःला उद्देशून म्हणत असत) कधीही नावं ठेऊ नये.. असे माझे सासरे म्हणत आणि दुसरे छान 👌 म्हणणं म्हणजे ते अन्न (जेवण) ज्या गृहिणीने बनवलंय तिचा तो सन्मान असे.
आमची वाडेकर मंडळी कोणाकडेही जेवायला गेली तरी एक घास खाल्ला कि लगेचच जेवण बनवणाऱ्या गृहीणीला रिप्लाय देतात.. "छान झालंय हं जेवण !"👌👌 त्यावेळी त्या गृहिणीच्या चेहऱ्यावरील आनंद 🤗🤗 बघण्यासारखा असतो.. हे मी स्वतः अनुभवलंय आणि पाहिलं देखील आहे.
तशा माझ्या सासुबाईही सुगरण होत्या.. टुकीनं संसार करणं म्हणजे काय.. अन्न वायाही जाणार नाही अन् शिळं ही खावं लागणार नाही. हे कसं ते मी त्यांच्याकडून शिकले... यांच्याविषयी पुन्हा केव्हातरी.
तर सांगण्याचा मुद्दा काय.... तर ही युक्ती आज कामी आली आणि मी लाल तिखट घालून उपमा बनवला अन सर्वाना नाष्टा दिला.. सर्वांनी तो आनंदाने संपवला 😋 मलाच टेन्शन आलं होतं 😇 पण छान झाला होता.. 👍
• रवा उपमा आहे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर-
रवा म्हणजेच सुजी जी गव्हापासून बनवली जाते.. ज्यात कर्बोदके आणि प्रथीने भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे गव्हाच्या या रव्यापासून बनवलेला हा उपमा सकाळच्या वेळी नाश्त्यामध्ये बनवला तर दिवसभर भरपूर एनर्जी मिळते. वजन कमी करण्यासाठी उपमा हे एक उत्कृष्ट अन्न आहे. उपम्यामध्ये फायबर, जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात.
नाष्टा मग तो सकाळचा असो की संध्याकाळचा त्यासाठी उपमा ही एक परिपूर्ण डिश आहे. यात तुम्ही वेगवेगळ्या भाज्या देखील घालून हेल्दी उपमा डिश बनवू शकता. तुमच्याकडे ज्या भाज्या घरी उपलब्ध असतील त्याचा तुम्ही बनवताना वापर करू शकता. जसे की फ्लॉवर, कोबी, गाजर, टोमॅटो, सिमला मिरची, मटार इत्यादी.
Breakfast Recipe in Marathi : Upma "पारंपारिक मराठी उपमा रेसिपी : चव आणि पोषण यांचे परिपूर्ण मिश्रण" |
भाज्या घालून बनवलेल्या उपम्याची पौष्टिकता तर वाढतेच पण दिवसभर खुप एनरजेटीक वाटते. शिवाय मुले भाज्या खात नाहीत या तक्रारीवर भाज्या घालून केलेला उपमा उत्तम पर्याय आहे. मुलेही अगदी आवडीने खातात आणि त्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने भाज्या खाऊ घालण्याचा आपला प्रयत्न यशस्वी होतो शिवाय मानसिक समाधान मिळते ते वेगळेच.
Breakfast Recipe in Marathi वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा डिश बनवल्या जातात.. जसे की रवा उपमा मध्ये टोमॅटो उपमा, मटार उपमा, बटाटा उपमा तसेच शेवई उपमा, खपली गहू पासून बनवलेल्या रव्याचा उपमा, ज्वारीपासून बनवलेल्या रव्याचा उपमा अशा वेगवेगळ्या प्रकारचा उपमा आपण बनवू शकतो जो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
शेवई उपमा देखील वेगवेगळ्या भाज्या घालून बनवल्यास त्याचे पोषण मूल्य वाढते, शिवाय टेस्टीही होतो. हा उपमा देखील रवा उपमा सारखाच बनवला जातो. फक्त रवा ऐवजी शेवई वापरायची बाकी कृती सर्व तीच आहे.
उपमा ही डिश तुम्ही हिरवी मिरची घालून बनवू शकता अथवा लाल मिरची पावडर वापरून देखील उपमा बनवू शकता. वेगवेगळ्या प्रकारे बनवलेला हा उपमा आरोग्यच्या दृष्टीने उत्तम डिश आहे. पूर्वापार चालत आलेली ही रेसिपी अगदी झटपट होणारी पौष्टिक डिश आहे.
"पारंपारिक मराठी उपमा रेसिपी ही एक उत्तम रेसिपी असून चव आणि पोषण यांचे परिपूर्ण मिश्रण आहे".
"हेल्दी ब्रेकफास्टसाठी झटपट आणि सोपी मराठी उपमा रेसिपी"
चला तर मग पाहुयात हेल्दी उपम्यासाठी लागणारं आवश्यक साहित्य.. ⤵️
• बारीक रवा 1 वाटी
• शेंगदाणे पाव वाटी
• कांदा 1
• टोमॅटो 1
• गाजर 1
• सिमला मिरची 1
• फ्लॉवर अर्धी वाटी
• कोबी अर्धी वाटी
• मटार अर्धी वाटी
• जिरे पाव चमचा
• मोहरी पाव चमचा
• उडीद डाळ पाव चमचा
• हिंग पाव चमचा
• कडीपत्ता
• हिरवी मिरची 5-6
• आले पाव चमचा
• मीठ आवश्यकतेनुसार
• लिंबू 1
• साखर 1 चमचा
• कोथिंबीर
• तेल 4 tbsp
Breakfast Recipe in Marathi : Upma "पारंपारिक मराठी उपमा रेसिपी : चव आणि पोषण यांचे परिपूर्ण मिश्रण" |
Mother's Day : "आगळावेगळा मातृदिन" लेकीने दिले मला एक दिवसाचे माहेर.
• झटपट होणाऱ्या हेल्दी उपम्याची आवश्यक कृती.. ⤵️
प्रथम कढईत 1चमचा तेल घालून रवा चांगला भाजून एका प्लेट मध्ये काढून घ्यावा.
दुसऱ्या गॅसवर 3 वाटी पाणी एका पातेल्यात उकळन्यासाठीठेवावे.
पाणी उकळेपर्यंत कांदा, टोमॅटो सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात.
त्यानंतर त्याच कढईत 3चमचे तेल घालून शेंगदाणे तळून घ्यावेत
यानंतर जिरे, मोहरी, कडीपत्ता, हिंग, आले, हिरवी मिरची आणि उडीद डाळ घालून फोडणी करावी.
त्या फोडणीत बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालून परतावे.
यानंतर एक एक करून सर्व भाज्या घालव्यात.
आता यात थोडे मीठ व साखर घालून लिंबू पिळावे आणि झाकण ठेवून वाफ आणावी. .
यात भाजलेला रवा, तळलेले शेंगदाणे आणि मीठ घालून एकसारखे हलवून घ्यावे.
Breakfast Recipe in Marathi : Upma "पारंपारिक मराठी उपमा रेसिपी : चव आणि पोषण यांचे परिपूर्ण मिश्रण" |
Marathi Recipe : How to make - हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची भाजी
आता यात उकळलेले पाणी घालून झाकण ठेवावे.
दोन तीन मिनिटांनंतर झाकण काढून उपमा व्यवस्थित हलवून घ्यावा.
कोथिंबीर घालावी आणि डिश सर्व्ह करावी.
आपला झटपट होणारा हेल्दी उपमा तैयार!
Breakfast Recipe in Marathi : Upma "पारंपारिक मराठी उपमा रेसिपी : चव आणि पोषण यांचे परिपूर्ण मिश्रण" |
• उपमा सर्व्ह करण्यासाठी सूचना -
उपमा सर्व्ह करताना वरून बारीक शेव, कोथींबीर घालावी आणि सोबत लिंबाची फोड द्यावी.
काही ठिकाणी उपम्यासोबत तळलेली मिरची देखील देतात.
तर काही ठिकाणी इडली डोशासोबत जी चटणी बनवतात ती दिली जाते.
थोडक्यात काय तर जिथे जी पद्धत असेल त्याप्रमाणे ही उपमा डिश सर्व्ह केली जाते.
• टीप :
रवा सुरुवातीला भाजून घ्यावा यामुळे उपमा चिकट होत नाही तर एकदम मुलायम होतो.
विविध भाज्या घातल्याने उपम्याची पौष्टिकता वाढते त्यामुळे उपमा हेल्दी बनतो.
• मग तुम्हीही बनवणार ना असा हेल्दी उपमा..
• जरूर बनवा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा..
• रेसिपी आवडल्यास शेअर करा पण माझ्या नावासहित..
• कारण साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.
धन्यवाद..! 🙏🏻
©सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️
0 टिप्पण्या